शरद पवार यांची कोल्हापुरात उद्या निर्धार सभा; दसरा चौकातात कोणावर थेट निशाना, फलकांनी वेधले लक्ष

| Updated on: Aug 24, 2023 | 12:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची आज सभा होणार असून ऐतिहासिक दसरा चौकातून ते कोणावर निशाना साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर : 24 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार हे पहिल्यांदाच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आज आहेत. कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीवरून येथे दौरा आखला आहे. तर पवार यांची उद्या येथील ऐतिहासिक दसरा चौकात सभा होणार आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांसह राज्याच्या नजरा या सभेकडे लागल्या आहेत.

अजित पवार गटावर निशाना

याच्याआधी त्यांनी नाशिक आणि बीडमधील सभेतून थेट अजित पवार गटावर निशाना साधला होता. त्यामुळे या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर कोल्हापुरात होणाऱ्या सभेची तयारी झाली असून या सभेला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार आहेत.

मोठं मोठं फलक

शुक्रवारी (दि. २५) येथे दसरा चौकात सायंकाळी पाच वाजता सभा होणार असल्याने दसरा चौकात मोठं मोठं फलक लागले आहेत. त्या फलकांवर बाप बापच असतो आणि योद्धा पुन्हा मैदानात असे आशयाचे फलक लागले आहेत.

Published on: Aug 24, 2023 11:48 AM
चंद्रयान-3 चंद्रावर पोहोचू शकते मात्र खड्डे पर्यंत पालिका नाही; ठाकरे गटाने कुठे केलं अनोखे आंदोलन?
बावनकुळे यांच्या ‘त्या’ टीकेवर राऊत भडकले; म्हणाले, ‘कोण बावनकुळे?’