तिला विकत आणलं, चटके दिले, सुटका झाल्यावर… नागपूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

| Updated on: Aug 31, 2023 | 6:18 PM

गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुलीला घरात एकटे कोंडून कुटुंबीय बाहेरगावी गेले होते, खिडकीच्या ग्रीलमधून मुलगी बाहेर पडल्यावर शेजाऱ्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली.

नागपुर : 31 ऑगस्ट 2023 | हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील ‘अथर्व नगरी’ या उच्चभ्रू वस्तीमधील एक घटना समोर आली आहे. उच्चभ्रू वस्ती असल्याने इथे कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. मात्र, त्या घराची लाईट कापण्यात आली. अंधारामुळे त्या घरातली मुलगी घाबरली. ती खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना ती दिसली. त्यामुळे सोसायटीतील नागरिक आणि सामाजिक संस्थेच्या लोकांनी तिला तिथून काढलं आणि पोलिसांच्या सुपूर्द केलं. तिची अधिक चौकशी केली असता तिने घरातील सगळी काम करवून घेतली जात होती. त्याचप्रमाणे तिला चटके दिले जात होते अशी माहिती दिली. ज्या परिवाराकडे ही मुलगी राहायची तो परिवार या सोसायटीत भाड्याने राहायचा, असे सोसायटीचे सेक्रेटरी यांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Published on: Aug 31, 2023 06:17 PM
अजितदादा शब्दाचे पक्के ! ‘माळेगाव साखर कारखान्याकडून उसाला राज्यात उच्चांकी दर, प्रतिटन किती रूपये जाहीर?
सुषमा अंधारे यांचा नवनीत राणा यांना टोला; म्हणाल्या, त्या बाईला धड….