ठाकरे गटातील महिला आघाडीच आता शिंदे गटात येणार; शिंदे गटाच्या महिला नेत्याचा मोठा दावा

| Updated on: Jun 19, 2023 | 2:08 PM

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करत राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावरून आता राजकारण तापलेलं आहे. याचदरम्यान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी कायंदे यांच्या पक्षप्रवेशावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे.

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनाला फक्त 24 तास उरले असतानाच ठाकरे गटाला दोन नेत्यांनी धक्का देत जय महाराष्ट्र केला. त्यातील ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करत राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावरून आता राजकारण तापलेलं आहे. याचदरम्यान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी कायंदे यांच्या पक्षप्रवेशावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना, जे कायंदे यांच्यावर टीका करतायेत ते थुक्रट प्रवक्ते आहेत. त्यांना त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा फाईली दिसतायेत. कधी खोकेही दिसतायेत. तर ज्यांचा शिवसैनिक संबंध नाहीत त्यांना तेथे स्थान दिलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण महिला आघाडीच प्रचंड असंतोष आहे. यामुळे येत्या काही काळात ठाकरे गटातील संपूर्ण महिला आघाडीच शिंदे यांच्या शिवसेनेत येईल असा दावा म्हात्रे यांनी केला आहे.

Published on: Jun 19, 2023 02:08 PM
राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर शिंदे गटाच्या महिला नेत्याचा पलटवार; म्हणाल्या, ‘…गद्दारी कोणी’
“शिवसेना फुटली याचं वाईट वाटतंय, तरी सुद्धा शिवसेना अभेद्य राहावी, ही मनातली इच्छा”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची शुभेच्छा!