VIDEO | ‘अंधारे पॉलिटीकली स्टंटबाजी करतात’, शिंदे गटाच्या महिला नेच्याची खरमरीत टीका
कल्याणमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरन तापलेलं आहे. राजकीय नेत्यांकडून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
कल्याण : 19 ऑगस्ट 2023 | गेल्या पंधरा दिवसात कल्याण पूर्व भागातील महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात ठाकरे गटकडून जारदार टीका केली जात आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सुषमा अंधारे यांनी काढला मूक मोर्चा काढला होता. त्याच कारणावरून कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा देखील मुख मोर्चा काढला. त्यावरून सुषमा अंधारे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना, भाजपकडेच गृह खातं असून भाजपचे आमदार मूक मोर्चा काढत असल्याने घरचा आहेर दिलाय अशी टीका केली होती. त्यावर आता शिंदे गटातील महिला नेत्याने टीकास्त्र सोडलं आहे. शिंदे गटाचे महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी अंधारे यांना निशाना करताना, कल्याणमध्ये झालेले घटना दुर्दैवी आहे. त्याच्यावरती योग्य ती कारवाई होईल. मात्र अंधारे यांना फक्त आरोप करणे आणि दुसऱ्यांना बोलण्याच्या पलीकडे काहीच जमत नाही. तर मागितला नसलेला सल्ला देण्याची त्यांना फार वाईट सवय आहे. तसेच नसलेली नाती जोडण्याचा त्यांना फार वाईट छंद असून त्या फक्त पॉलिटिकल स्टंटबाजी ते करतात अशी टीका करताना म्हात्रे यांनी अंधारे यांना निशाना केलाय.