शिवसेनेत गेलेल्या नीलम गोऱ्हे त्यांच्या सभापती पदावरच अधिवेशनातच आक्षेप

| Updated on: Jul 17, 2023 | 2:19 PM

हे अधिवेश आज तहकूब करण्यात आलं असून विरोधकांनी पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर विधानसभेबाहेर पायऱ्यांवर जोरादार घोषणाबाजी केली.

मुंबई, 17 जुलै 2023 | शिंदे-फडणवीस-पवार सरकराचं पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस. हे अधिवेश आज तहकूब करण्यात आलं असून विरोधकांनी पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर विधानसभेबाहेर पायऱ्यांवर जोरादार घोषणाबाजी केली. याचदरम्यान विधान परिषदेत मात्र विरोधकांसह शेकाप पक्षानं थेट विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरच आक्षेप घेतला. ज्यामुळं थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यात उत्तर द्यावं लागलं. तर होणाऱ्या गोंधळामुळं तुम्हाला माझ्याविरोधात आक्षेप घ्यायचा असेल तर घ्या अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांना घ्यावी लागली. विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच शेकापचे जयंत पाटील यांनी थेट गोऱ्हे यांच्यावरच आक्षेप घेतला. यावेळी त्यांनी, सभापती महोदया तुमच्यावर आक्षेप आहे म्हणत, ज्या या पदावर बसल्या त्यावेळी त्यांचा पक्ष संपला, पक्ष सदस्यत्व जातं असं म्हणत त्यांनी अक्षेप घेतला. यावरून फडणवीस यांनी, यावरून असं कधीही कुठल्याही वेळी सभापतींवर आक्षेप घेता येत नाही असा पवित्रा घेतला. यानंतर विरोधकांनी याचविषयावरून सभा त्याग केली.

Published on: Jul 17, 2023 02:19 PM
एनडीएच्या बैठकीला बच्चू कडू जाणार; मांडणार ‘हे’ महत्वाचे मुद्दे
विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाचा नेता स्पष्टच बोलला…