मुंबई महापालिकेसाठी आशिष शेलारांकडे शिलेदाराची जबाबदारी -देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 20, 2022 | 4:29 PM

आशिष शेलारांना पुन्हा अध्यक्ष बनवायचा निर्णय हा पक्षाने घेतला. तसंच केंद्रीय भारतीय जनता पक्षाने आपला बिनीचा शिलेदार आशिष शेलार याला सांगितला आहे. की मुंबई महानगरपालिकेवर भगवा लावायचा आहे त्यामुळे तुम्ही मुंबईचा अध्यक्ष पद स्वीकारा आणि मला विश्वास आहे मागच्याही काळामध्ये ते अध्यक्ष असताना मोठी मजल मुंबई महानगरपालिकेत आपण मारली असेही ते म्हणाले.

मुंबई – खरं म्हणजे आज मला अतिशय आनंद आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या दोन कार्यकर्त्यांचा आपण सत्कार केला. मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat lodha ) यांनी गेली तीन वर्ष समर्थपणे मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. कोरोनाच्या काळातही प्रचंड ऍक्टिव्हिटी मुंबई भाजपने केली लोकांना मदत करण्यापासून आंदोलनापर्यंत एकही दिवस मुंबईची भारतीय जनता पार्टी (BJP) बसली नाही. वेगवेगळ्या मोर्चाच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकांना एकत्रितपणे आणले. मुंबईत भाजपमधील एक बहुजन चेहरा एक सर्वव्यापी असा चेहरा जो मंगल प्रभात लोढा आणि आता तेच मंगल प्रभात लोढाजी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आले.  आता मंत्रिमंडळ त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर ते ते पूर्णपणे याला न्याय देतील हा मला विश्वास आहे.  मंगलजी मंत्री म्हणून सरकारी काम तर करायचं आहे.  पण त्याचवेळी अशी पूर्ण ताकद देऊन पक्षाचेही काम तेवढ्याच ताकदीने आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. आपले नूतन अध्यक्ष आशिष शेलारजींचं(Ashish Shelar)खरं म्हणजे अशी शेलारजी आहेत आणि मुंबईमध्ये प्रदीर्घ काळ त्यांनी अध्यक्ष पद स्वीकारलं.

 

Published on: Aug 20, 2022 04:29 PM
क्राइम ब्रांचकडे सदर प्रकरणाचा तपास- मुंबई आयुक्त
नागपूरमधील रामटेक परिसरातील पूर परिस्थितीवर आशिष जैस्वालांचा गंभीर आरोप