वर्धापन दिन शिवसेनेचा, चर्चा मात्र मनसेच्या टि्वटची; अशी काय केली आहे टीका?

| Updated on: Jun 20, 2023 | 12:55 PM

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले. तर शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर तर ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचा समाचार घेतला. त्यावरून काल आणि आज अनेक चर्चा होताना दिसत आहेत. मात्र या चर्चांपेक्षा अधिक चर्चा ही राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केलेल्या ट्विटची होत आहे.

मुंबई : 19 जून ही शिवसेनेचा वर्धापन दिन. हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून जोरदार करण्यात आला. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले. तर शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर तर ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचा समाचार घेतला. त्यावरून काल आणि आज अनेक चर्चा होताना दिसत आहेत. मात्र या चर्चांपेक्षा अधिक चर्चा ही राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केलेल्या ट्विटची होत आहे. मनसेकडून शिंदे आणि ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या ट्विटमध्ये प्रबोधनकारांनी रुजविलेला, स्व. बाळासाहेबांनी बहरवलेला ‘शिवसेना’ हा विचार आज वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी भरकटवला…ह्याचसाठी स्व. बाळासाहेब आणि त्यांचे सहकारी रक्ताचं पाणी करून झिजले होते का? असा सवाल करण्यात आला आहे.

Published on: Jun 20, 2023 12:55 PM
“उद्धव ठाकरे मविआची चाकरी करतायत”, रवी राणा यांचा गंभीर आरोप
‘महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त’; राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोके दिन साजरा