Nandkumar Ghodile | शिंदे गट भाजपची कठपुतळी,नंदकुमार घोडीले यांनी सोडले टीकास्त्र, खरी शिवसेनाच निवडणुकीत बाजी मारणार असल्याचा विश्वास

| Updated on: Jul 28, 2022 | 4:01 PM

Nandkumar Ghodile | शिंदे गट हा भाजपची कठपुतळी असल्याचे टीकास्त्र औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडीले यांनी सोडले आहे.

Nandkumar Ghodile | औरंगाबाद महापालिकाला (Aurangabad Municipal Corporation) निवडणुकीसाठी (Election) शिंदे गट आणि भाजप गटाने मोर्चेबांधणी (Shinde Group with BJP) सुरु केली आहे. निवडणुकीत सर्वच पक्षांअगोदर भाजप आणि शिंदे गटाने मोर्चा उघडला आहे. त्यामुळे इतर पक्ष दणक्यात जागे झाले आहेत. शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडीले (Nandkumar Ghodile) यांनी या युतीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गट हा भाजपची कठपुतळी असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. लोकांची निष्ठा आणि प्रेम केवळ बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आहे. शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न वापरता मतांचा जोगावा मागून दाखवावा, असे आव्हान ही त्यांनी शिंदे गटाला दिले. शिंदे गट किती बढाया मारत असला तरी दोन तीन नगरसेवकांच्या व्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात एक ही नगरसेवक नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सर्वांनी एकमुखानं उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसा ही ठरावचं घेण्यात आल्याचं त्यांनी सांगतिलं. येत्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचाच महापौर होईल आणि भगवा महापालिकेवर फडकेल असे त्यांनी सांगितले.

robbers jailed | झारखंडमधील दरोडेखोरांची टोळी जेरबंद, पुणे पोलिसांची जबरदस्त कामगिरी
Nilesh Rane On Thackeray | उद्धव ठाकरे यांनी फुटलेला पेपर सोडवला, निलेश राणे यांचा ठाकरे यांच्या मुलाखतीवर शाब्दिक हल्ला