अजित पवार याचं संजय राऊत यांच्या ‘डेथ वॉरंट’वर सुचकं वक्तव्य; म्हणाले…

| Updated on: Apr 23, 2023 | 2:54 PM

शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी, आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. या गल्लीगुंडांना लोक घरी बसवतील ही मला खात्री आहे, असं म्हटलं आहे.

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे. येत्या 15 दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी, आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. या गल्लीगुंडांना लोक घरी बसवतील ही मला खात्री आहे, असं म्हटलं आहे. यावरून विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी, याबाबत माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी त्याच्याबद्दल काय तुम्हाला सांगणार असा सवाल विचारत काहीही न बोलणं पसंत केलं आहे. तर संजय राऊत आणि त्यांची भेट ही नागपूरच्या वज्रमूठ सभेत झाली होती. त्यानंतर ना समक्ष आणि ना फोनवर बलणं झाल्याचे ते म्हणाले. सरकार पडणार हे ते कोणत्या माहितीवर बोलतात हे आपल्याला माहित नसल्याचेही ते म्हणाले. तर राऊत हे त्यांच्या माहितीच्या अधिकारावर, अनुभवाच्या माध्यमातून करत असतील असेही ते म्हणाले.

Published on: Apr 23, 2023 02:54 PM
धक्कादायक! गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेचे हॉल तिकीटची लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल
अरे बाबा, तुझे पोट दुखायचं काय कारण? अजित पवार पत्रकारावरच भडकले? अमृता फडणवीस यांच्याशी काय संबंध?