Maharashtra Power Crisis : भाजप नेत्याचा विरोधकांवर ठाकरे गटावर पलटवार म्हणाले, मुंगेरीलालचे डीएनए
हे सरकार पडेल असेही बोलले जात आहे. त्यावरून भाजप नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Power Crisis) निकाल आता अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य आज ठरणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री राहतात की त्यांना पाय उतार व्हावं लागतं यावरून तर्कवितर्क लढवले जात आहे. तर हे सरकार पडेल असेही बोलले जात आहे. त्यावरून भाजप नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना, सर्वोच्च न्यायालाच्या घटनापीठाकडून राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर मंत्री मुनगंटीवर यांनी भाष्य केले. सत्तासंघर्ष असता तर आम्ही या कार्यक्रमाला आलो असतो का? तर असं आमदारांना अपात्र करता येत नाही. अपात्रतेचा आता प्रश्न उपस्थितच होत नाही. त्यामुळं सत्याचाच विजय होतो आणि होईल. काही लोक हवा पसरविण्याचा प्रयत्न करतात, मायावी विचार मांडतात, गैरसमज निर्माण करतात; पण त्यांच्या सांगण्याने काहीही होणार नाही. जनतेच्या विकासासाठी आम्ही काम करतोय आणि पुढेही काम करणार. तर मुंगेरीलालचे डीएनए असणारे लोकही आता असल्याचे वाटतेय, असा टोलाही मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाला हाणला.