मेंदूत फरक झालाय, दुरूस्त करणं गरजेचं…; राऊत यांच्यावर कडूंचा प्रहार
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं होतं. तसेच खोक्यावरून टीका देखील केली होती. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे
मुंबई : गुढीपाडव्यानिमित्ता आनंदाचा शिधा मिळणारा, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र अनेक ठिकाणी त्याचा पुरवठा झालेला नाही. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं होतं. तसेच खोक्यावरून टीका देखील केली होती. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार करताना संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी खोचक टीका केली आहे.
राऊत यांनी, ‘दिवाळीचा शिधाही मिळालेला नाही. शिधा हा फक्त आमदारांना खोक्यात मिळतो. गरीबांना मिळत नाही असं म्हटलं आहे. त्यावर कडू यांनी प्रत्युत्तर देताना, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. रोज सकाळी त्यांच्या स्वप्नात खोके येतात. तर त्यांच्या मेंदूत फरक झालाय, दुरूस्त करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
Published on: Mar 21, 2023 01:23 PM