जाहिरातीवरुन वाद पेटला! शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपला इशाराच दिला, म्हणाला, ‘फक्त जाणीव ठेवा’
जाहिरातींवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. सर्व्हेच्या जाहिरातीवरुन सुरू झालेला वाद हा आता सरकार स्थापन आणि पाठिंब्यापर्यंत गेला आहे. तर सर्व्हेच्या जाहिरात भाजपला चांगलीच जिव्हारी लागल्याने भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली.
मुंबई : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला आता काहीच दिवसात एक वर्ष पुर्ण होत आहे. मात्र त्याआधीच जाहिरातींवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. सर्व्हेच्या जाहिरातीवरुन सुरू झालेला वाद हा आता सरकार स्थापन आणि पाठिंब्यापर्यंत गेला आहे. तर सर्व्हेच्या जाहिरात भाजपला चांगलीच जिव्हारी लागल्याने भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली. बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, असा टोला बोडेंनी लगावला आहे. त्यावर आता संजय शिरसाठ यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी बोंडे हे माझे मित्र आहेत. मात्र अशा वक्तव्यामुळे युतीवर परिणाम होतो. तर शिंदे हे फक्त ठाण्याचे मुख्यमंत्री नसून ते महाराष्ट्राचे आहेत हे याद राखा. याची जाणीव ठेवा असं सुनावलं आहे.
Published on: Jun 15, 2023 08:34 AM