जळगावात भाजपला झटका, मंत्री महाजन समर्थक नगरसेवक अपात्र; शिवसेना ठाकरे गटाची खेळी

| Updated on: Apr 14, 2023 | 1:34 PM

लता भोईटे, कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशिव ढेकळे यांना येथील बहुचर्चित घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झाली होती. या नगरसेवकांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटातील नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली

जळगाव : राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल येण्याची शक्यता आहे. त्यातच हे शिंदे-फडणवीस सरकार शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यावधी लागू शकते. अशातच जळगावमध्ये मात्र भाजपला दणका बसल्याचे आणि तो दणका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना नगरसेवकाने दिल्याचे समोर आले आहे. जळगाव महापालिकेतील मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक असलेले चार नगरसेवक अपात्र ठरले आहेत. जळगाव जिल्हा न्यायालयाने निर्णय दिल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. लता भोईटे, कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशिव ढेकळे यांना येथील बहुचर्चित घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झाली होती. या नगरसेवकांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटातील नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने भाजपच्या चार नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.

Published on: Apr 14, 2023 01:34 PM
जनतेचा माफी मागा, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील; राहुल गांधींना भाजपच्या नेत्याचा इशारा
मविआ लोकसभेला किती जागा जिंकणार?, संजय राऊत यांनी स्पष्ट आकडाच सांगितला