जळगावात राऊत गुलाबराव पाटील आमने-सामने, सभेआधीच शब्दांचा सामना रंगला

| Updated on: Apr 23, 2023 | 9:36 AM

शिंदे गट आणि ठाकरे गटातील कलगितुरा संपायला काही तयार नाही. दोन्ही बाजूनं रोज आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा सुरूच आहे. मंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दीक चकमक होताना दिसत आहे

जळगाव : शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासह शिवसेनेला निशाना करण्याची उद्धव ठाकरे गटाकडून एकही संधी सोडली जात नाही. त्यातच राज्यभर महाविकासआघाडीतर्फे वज्रमुठ सभेचे आयोजन केले जात आहे. तर ठाकरे गटाच्या वेगळ्या सभाही होत आहेत. अशीच सभा जळगावच्या पाचोऱ्यात आयोजीत करण्यात आली आहे. मात्र या सभेआधीच ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटातील कलगितुरा संपायला काही तयार नाही. दोन्ही बाजूनं रोज आव्हान-प्रतिआव्हानाची भाषा सुरूच आहे. मंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दीक चकमक होताना दिसत आहे. चौकटीत बोलानंतर आम्ही दगड मारून सभा बंद करणारे. त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला चॅलेंज करू नये असे थेट आवाहन गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिले आहे. त्यावर आम्ही डरपोक नाही, अशा धमक्यांना घाबरत नाही, असे राऊत म्हणाले. तर खरंतर गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गॅंग आहे. एक चित्रपट होता तसे हे आहे म्हणत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे

Published on: Apr 23, 2023 09:36 AM
राजकीय उलथापालथ होणार? भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; बघा काय होणार अनपेक्षित घटना
खारघर दुर्घटनेनंतर भारतीय हवामान विभागाच्या हालचाली सुरू, कोणता घेतला निर्णय?