“अनेक राज्यात भाजपविरोधी ट्रेंड”, शरद पवारांच्या टीकेवर शिंदे-फडणवीस म्हणता, “मोदी सरकार…”
गुजरात, उत्तरप्रदेश, आसाम, सोडल्यास इतर राज्यात भाजपविरोधी ट्रेंड सुरु आहे, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर साधला. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्रात भाजप नाही. राज्याच्या निवडणुकीत लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल.
मुंबई : “गुजरात, उत्तरप्रदेश, आसाम, सोडल्यास इतर राज्यात भाजपविरोधी ट्रेंड सुरु आहे, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर साधला. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्रात भाजप नाही. राज्याच्या निवडणुकीत लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल. हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही”, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या विधनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मोदींच्या नावावर 300 पेक्षा जास्त खासदार निवडणून आले मग मोंदींविरोधात कुठली लाट आली?” असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे. तसेच “शरद पवार बोलतात त्याच्या विरुद्ध होतं, 2024 मध्ये पुन्हा मोदी सरकारच येणार”, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला आहे.