सामना म्हणजे उंदराला सापडली चिंधी
कोणत्याही सरकारीची जबाबदारी ही सामुहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराविषयी कोणीही नाराज नाही मात्र सामनाची परिस्थिती ही उंदरासारखी झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर विरोधकांकडून टीका होत असतानाच सामनामधूनही जोरदार निशाना साधण्यात आला. त्यामुळे त्यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी सामना आणि शिवसेनेवर जोरदार टोला हाणला. उंदाराला मिळाली चिंधी, ती इथं ठेऊ की तिथं ठेऊ अशी परिस्थिती शिवसेनेची झाली असल्याची टीका नूतन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर कुणीही नााराज नसल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही सरकारीची जबाबदारी ही सामुहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराविषयी कोणीही नाराज नाही मात्र सामनाची परिस्थिती ही उंदरासारखी झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
Published on: Aug 15, 2022 03:01 PM