Ambadas Danve : शिंदे सरकार बुलेट ट्रेनमध्ये अडकलेले, शेतकऱ्यांचे प्रश्न वाऱ्यावर
आंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे हे बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी बीड तालुक्यातील समनापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांचे दु:ख मांडताना त्यांनी हे आरोप शिंदे सरकारवर केले आहेत. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. पण त्याचा त्यांना विसर पडला असून आश्वासने शेतकऱ्यांना आणि अंमलबजावणी मात्र मेट्रोची असे त्यांचे धोरण आहे.
बीड : अवघ्या अडीच महिन्यामध्ये (Eknath Shinde) शिंदे सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव घेऊन हे सत्तेवर आले आहेत त्यांनाच आता यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve) आंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे हे (Beed) बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी बीड तालुक्यातील समनापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांचे दु:ख मांडताना त्यांनी हे आरोप शिंदे सरकारवर केले आहेत. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. पण त्याचा त्यांना विसर पडला असून आश्वासने शेतकऱ्यांना आणि अंमलबजावणी मात्र मेट्रोची असे त्यांचे धोरण आहे. शिंदे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका आंबादास दानवे यांनी बीडमध्ये केली आहे.
Published on: Sep 04, 2022 07:37 PM