‘कोणीतरी डोळे वटारल्याने नवी जाहिरात आली’; जयंत पाटील यांची शिंदे गटावर खरमरीत टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटासह भाजपला खोचक टोल्या लगावला आहे. त्यांनी शिंदे गटाच्या माहित नसलेल्या समर्थकाने काल जाहिरात दिली. त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचाच फोटो दाखवण्यात आला.
मुंबई : राज्यात शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. यावरून शिंदे गटात आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे. जाहिरातबाजीवरून युतीतच सध्या वादंग होत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटासह भाजपला खोचक टोल्या लगावला आहे. त्यांनी शिंदे गटाच्या माहित नसलेल्या समर्थकाने काल जाहिरात दिली. त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचाच फोटो दाखवण्यात आला. मात्र देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वगळला. त्याचबरोबर फडणवीस यांना शिंदेंनी मागे टाकले असं दाखवण्यात आलं. मात्र कोणीतरी डोळे वटारल्यानेच आता नवी जाहिरात द्यावी लागली. तर दररोज पानभर जाहिराती हे करत आहेत. त्यामुळे सकाळी सकाळी पेपरमध्ये यांचेच चेहरे बघावे लागत आहेत. सामान्य जनता, इथली दुष्काळी परिस्थिती याविषयी सरकारला काही वाटत नाही. तर दोन्ही पक्षांतर्गत काही मतभेद पाहायला मिळत आहेत.