भर कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या
‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीने नवा वाद सुरू केला. त्यानंतर राज्यभरात भाजपा-शिंदे गटातील मतभेद समोर आले. यानंतर विरोधकांकडून या जाहिरातीवर आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीवर सडकून टीका करण्यात आली.
मुंबई : काही दिवसांपुर्वी शिंदे गट आणि भाजपमध्ये कल्याण लोकसभा मतदार संघावरून वाद उफाळून आला होता. त्यावर पडदा पडला तोच ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीने नवा वाद सुरू केला. त्यानंतर राज्यभरात भाजपा-शिंदे गटातील मतभेद समोर आले. यानंतर विरोधकांकडून या जाहिरातीवर आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीवर सडकून टीका करण्यात आली. यावर खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंच त्याबरोबर कार्यकर्त्यांना देखील ठणकवालं आहे. त्यांनी आपण लोकांची कामं करत अशताना मतदार संघात फिरत असतो. त्यावेळा लोकांच्या नजरेस येतो. मात्र हे आता लोकांच्या नजरेत खुपत आहे असा टोला लगावला आहे. याचदरम्यान आपण हे विरोधकांना म्हणतोय हे स्पष्ट केलं. नाहीतर परत पत्रकार हे भाजपवाल्यांना असं लिहतील असे म्हणाले. तर हे सरकार एका उद्देशानं बनलं आहे. त्यामुळं हे तुझं हे माझं असे करणं बाजूला ठेवा असं त्यांनी कार्यकर्त्यांना ठणकावत सांगितलं आहे.