Uddhav Thackeray on Shinde Group | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका- tv9
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आमच्याकडे येणारी खोकी ही निष्ठेची आहेत. ती खोकी तुम्हाला लखलाभ.
मागिल काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे आणि शिंदे गटा विरूद्ध शिवसेना असा कलगितूरा पहायला मिळत आहे. दररोज एकमेकावर अरोप होताना येथे पहायला मिळत आहे. आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आमच्याकडे येणारी खोकी ही निष्ठेची आहेत. ती खोकी तुम्हाला लखलाभ. याचबरोबर ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना अजून निष्ठेचे खोकी आपल्याकडे भरभरून आल पाहिजे असे त्यांनी सूचना केलेल्या आहेत.
Published on: Aug 21, 2022 05:38 PM