बहुमत चाचणी राजभवनात नाही तर सभागृहात होते; साळवेंचा युक्तिवाद
राज्यातील सत्तासंघर्षाच्या आजच्या सुनावणीत हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. यावेळी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेल्या जोडपत्रातील राज्यपालांच्या अधिकारांचा गैरवापरवरून साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला
मुंबई : महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापवणारा आजचा दिवस आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या आजच्या सुनावणीत हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. यावेळी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेल्या जोडपत्रातील राज्यपालांच्या अधिकारांचा गैरवापरवरून साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला. साळवे यांनी, राज्यपालांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. बहुमत चाचणी ही राजभवनात नाही तर सभागृहामध्ये होते असंही साळवे म्हणाले. तर नबाम रबिया प्रकरणाचा विचार केला जात असेल, तर तो योग्य पद्धतीने व्हायला हवा असाही युक्तिवाद साळवे यांनी केला.
Published on: Mar 14, 2023 01:09 PM