गुणरत्न सदावर्ते यांना सरकारचा वरदहस्त, अडसूळांचा घरचा आहेर

| Updated on: Dec 29, 2023 | 9:17 PM

एसटी कर्मचारी को-ऑप. बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून गुणरत्न सदावर्ते यांचे मेहूणे सौरभ पाटील यांची सहकार आयुक्तांनी हक्कालपट्टी केली आहे. परस्पर कर्मचाऱ्यांची भरती करणे, एसटीच्या कारभाराने ठेवींमध्ये घट होणे, तसेच सातव्या आयोगाचे आमीष दाखवून संप घडवून कामगारांचे नुकसान करणे असे आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आहेत. सदावर्ते यांना सरकारचा वरदहस्त असल्याचा घरचा आहेर शिवसेना शिंदे गटातील नेते आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : एसटी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून गुणरत्न सदावर्ते यांचे मेहुणे सौरभ पाटील यांची हक्काल पट्टी करण्यात आली आहे. कोणतेही निकष न पाळता झालेल्या नियुक्तीमुळे सहकार आयुक्तांनी सौरभ पाटील यांची हक्कालपट्टी केली आहे. या प्रकरणात सदावर्ते यांना सरकारचा वरदहस्त आहे त्याशिवाय ते एवढी मस्ती करणार नाहीत असा घरचा आहेत शिवसेना शिंदे गटातील नेते आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. सदावर्ते यांच्यावर आपल्या अवघ्या 25 वर्षीय मेहुण्यास नियमबाह्यरित्या बॅंक व्यवस्थापक बनविणे, स्वत: आणि पत्नीला जयश्री पाटील हिला जज्ज्ञ स्वीकृत सदस्य म्हणून नेमण्याचा ठराव आणणं, 81 पदे परस्पर भरणे, महापुरुष आणि मान्यवरांसोबत नथुराम गोडसे आणि स्वत:चे फोटो लावणे असे आरोप आहेत. या बॅंकेत 2311 कोटीच्या ठेवी होत्या. त्या आता 1800 कोटी इतक्या राहिल्या आहेत. कामगारांना साडे सहा टक्के व्याजदराचे आमीष दाखवून बॅंकेवर कब्जा केला, सातवे वेतन मिळेल असे फसवून एसटीचा संप घडवून पाच ते सहा महिने वाया घालविल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला आहे. एसटी सदावर्ते यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मदतीने डेपोतून टाळे लावत एसटीचा संप घडवून आणला. या सर्व घोटाळ्याची आता एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

Published on: Dec 28, 2023 10:38 PM