Special Report | Deepak Kesarkar असं का म्हणाले? तर शिवसेना पुन्हा एकत्र येईल
राज्यातील सत्तांतर आणि बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांनी एकमेकांवर अरोप-प्रत्यारोप केले. यानंतर ते दोघे एकत्र येतील ही शक्यता मावळली होती.
राज्याच्या राजकारणात शिंदे गटाने बाजी मारत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला बाहेर फेकलं. तर भाजपने साथ देत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आणलं आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले.
राज्यातील सत्तांतर आणि बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. हे आरोप आजही सुरूच आहेत. तर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे मिळून मुळची शिवसेना बघायला मिळेल ही शक्यता मावळली होती.
मात्र आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी मात्र एक विधान करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते विधान होतं ‘….तर शिवसेना पुन्हा एकत्र येईल ‘….
Published on: Jan 02, 2023 01:41 PM