Deepak Kesarkar : Uddhav Thackeray यांची भेट घेतल्यासंदर्भात दीपक केसरकर म्हणतात… साहेब मला आपल्याबद्दल आदर आहे
केसरकर आणि ठाकरे यांच्या भेटीत काय झालं याबाबत बोलताना केसरकर म्हणाले, साहेब मला आपल्याबद्दल आदर आहे
अनेक दिवसापांसून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात शिवसेना फुटीवरून हमरी-तुमरी होताना दिसत आहे. सत्तेत असणाऱ्या शिंदे गटाला डिवचण्याचे काम ठाकरे गटाकडून होताना तर शिंदे गटाकडून ठाकरे गटाचा वेळोवेळी समाचार घेतला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदूत्वसाठी लढत आहेत. मात्र एका शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. त्यावरून शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दिपक केसरकर यांना अधिवेशनावेळी पत्रकारांनी शिंदे आणि ठाकरे यांच्यातील कटुता कमी होईल का असा प्रश्न विचारला.
त्यावर दिपक केसरकर यांनी हे उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचे म्हटलं आहे. तसेच कालच्या भेटीवेळी ठाकरे हे भावनाविवश झाल्याचेही केसरकर यांनी सांगितलं. तसेच केसरकर आणि ठाकरे यांच्या भेटीत काय झालं? हेच सांगत आहेत केसरकर पहा हा व्हीडिओ…
Published on: Jan 02, 2023 03:02 PM