“अडीच तासाच्यावर अडीच वर्षात, ते अकार्यक्षम मुख्यमंत्री, टीका करण्याचा अधिकार नाही” शिंदे गटाच्या नेत्याची टीका
त्या टीझरमधून त्यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्यात त्यांनी माझं सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं असं म्हणतं शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर भाजप नेते नितेश राणे, शिंदे गटाचे नेते, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला होता.
मुंबई, 26 जुलै 2023 | माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची “आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!” या शीर्षकाखाली मुलाखत आज प्रसिद्ध झाली. मात्र याचा टीझर आधीच लाँच करण्यात आला होता. त्या टीझरमधून त्यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्यात त्यांनी माझं सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं असं म्हणतं शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर भाजप नेते नितेश राणे, शिंदे गटाचे नेते, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी देखील खरमरीत टीका केली आहे. संजय गायकवाड यांनी, उद्धव ठाकरे हे स्वता: अकार्यक्षम आहेत हे ते सांगू शकत नाहीत असा घणाघात केलाय. तर ते अकार्यक्षम मुख्यमंत्री होते असा टोला लगावला. अडीच तासाच्यावर अडीच वर्षात ते कधी मंत्रालयात आले नाहीत. घराबाहेर पडले नाहीत. कोरोनाच्या भीतीने कोंडून घेतलं आणि पत्रकारांना सांगतात मी सरकार चालवलं. घरी बसून शेती, व्यवसाय किंवा काय करता येतं असा सवाल देखील गायकवाड यांनी ठाकरे यांना केला आहे. तर निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेवर बोलताना कोण काय बोलतं याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही असे देखील त्यांनी म्हटलं आहे.