‘उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही कार्यक्रम उरलेला नाही’; शिंदे गटाच्या नेत्याची खरमरीत टीका

| Updated on: Aug 07, 2023 | 2:10 PM

विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीची मोट बांधली आहे. या आघाडीची बैठक आता मुंबईत होणार असून त्याचे यजमान पद हे ठाकरे गटाकडे असणार आहे. ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.

मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आगामी लोकसभेच्या निवडणुकीत रोखण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष आता एकत्र आले आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीची मोट बांधली आहे. या आघाडीची बैठक आता मुंबईत होणार असून त्याचे यजमान पद हे ठाकरे गटाकडे असणार आहे. ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यावरूनही आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच आता ठाकरे यांच्याकडे दुसरं कोणतंच काम नसून त्यांच्याकडे आता एकच काम उरलं आहे. ते म्हणजे 31 ला राहुल गांधी कधी मुंबईला येणार आहेत. मग त्यांना जेवण कोण देणार? डावीकडे कोण आणि उजवीकडे कोण उभे राहणार असे प्रश्नच फक्त ठाकरे यांच्यासमोर असल्याचा टोला लगावला आहे.

Published on: Aug 07, 2023 02:07 PM
भर बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे एकमेकांना भिडले, नेमकं कारण काय?
राहुल गांधी यांना खासदारकी बहाल, आता पुन्हा सरकारी निवासस्थान मिळणार?