‘निधी वाटपाचा हा अलिखीत नियम’; दानवे-भूमरे बाचाबाचीवर शिंदे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 07, 2023 | 2:37 PM

विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याच बैठकितच जोरदार बाचाबाची झाली. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी दिला जातो असा आरोप दानवे यांनी केल्याने हा वाद झाला.

औरंगाबाद, 7 ऑगस्ट 2023 | औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज जोरदार राडा झाला. या राड्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा होत आहे. विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याच बैठकितच जोरदार बाचाबाची झाली. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी दिला जातो असा आरोप दानवे यांनी केल्याने हा वाद झाला. तर त्यावर संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र यावेळी अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं. यावरून आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दानवे यांना टोला लगावला आहे. तसेच निधी वाटपात सत्ताधारी पक्षातील आमदारांना जादा निधी दिला जातो. हा अलिखीत नियम असल्याचेही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 07, 2023 02:37 PM
आदित्य ठाकरे यांच्याकडून आणखी एक घोटाळा उघड; नेमकं प्रकरण काय?
BEST च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सलग ६ व्या दिवशी संप सुरू, बेस्टच्या PRO चं म्हणणं नेमकं काय?