आम्ही मतांसाठी कुणाचा पट्टा गळ्यात घालणार नाही, उद्धव ठाकरे यांच्यावर कोणी केली जहरी टिका

| Updated on: Aug 22, 2024 | 4:45 PM

बदलापूर प्रकरणातील पोलिसांची चूक होती याची कबूली आम्हीच देत आहोत. या प्रकरणात आम्ही दोषींवर गुन्हे दाखल केले आहेत. परंतू पीडीतांविषयी विरोधकांना कसली सहानुभूती नसून त्यांना केवळ नॅरेटिव्ह सेट करायचा आहे त्यामुळेच लाडकी बहीण योजनेने उल्हासाचे वातावरण गढूळ करण्यासाठी 24 चा बंद पुकारल्याचा आरोप संजय शिरसाठ यांनी केला आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यासाठी उशीर केला हे खरंच आहे. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता याची चौकशी झाली पाहीजेत आणि विरोधकांना बदलापूरच्या पिडीतेविषयी कोणतीही सहानुभूती नसल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी केला आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीला लवकरच फाशी दिली जाईल असेही शिरसाठ यांनी म्हटले आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी 24 ऑगस्टला भारत बंदचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या मागण्या जरी पाहील्या तरी कळेल की यांना बदलापूर पीडीती विषयी काहीही सहानुभूती नसून यांना केवळ ‘लाडकी बहीण योजने’ने निर्माण झालेले उल्हासाचे वातावरण गढूळ करायचे आहे. त्याच्यासाठीच 24 चा बंद आयोजित केल्याचा आरोप संजय शिरसाठ यांनी केला आहेत. विरोधकांना नॅरेटिव्ह सेट करायचे आहे. मतांसाठी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणलीय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे असा सवाल पत्रकारांनी विचारला त्यावर संजय शिरसाठ यांनी आम्ही महिलांच्या मतासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे,परंतू तुमच्या सारखा मतांसाठी कोणाचा पट्टा गळात घालणार नाही असा टोलाही संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कॉंग्रेसचे उपरणे उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर ठेवले असता ते त्यांनी घालण्यास नकार दिल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. त्यावर संजय शिरसाठी यांनी टोमणा लगावला आहे.

Published on: Aug 22, 2024 04:33 PM
SEBI ने दिली सूट, अदानी करतोय लूट,आणि ED बसलीय चूप, ईडी कार्यालयावर कॉंग्रेसचा धावा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे यांच्या भेटीला, काय झाली चर्चा