Gulabrao Patil | जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य
पैसाने सगळं साध्य करता येत नाही असं शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच जर सगळ्याच गोष्टी या पैसांनी झाल्या असत्या तर आज देशाचे पंतप्रधान हे टाटा आणि बिर्ला असते असे म्हटलं आहे.
राज्यात सत्तांतरावेळी एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे गुलाबराव पाटील ठामपणे उभे होते. तर ठाकरे गटाकडून होणाऱ्या विविध टीकेला उत्तर ही देण्याचे काम ते करतात. तर ठाकरे गटाकडून खोके सरकार अशी टीका ही शिंदे सरकारवर करण्यात येत यावरून जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाकडून वेळोवेळी शिंदे गटावर टीका केली जाते. तसेच खोके सरकार म्हणून टीका ही होते. यावर गुलाबराव पाटील यांनी सगळ्याच गोष्टी या पैसांनी झाल्या असत्या तर आज देशाचे पंतप्रधान हे टाटा आणि बिर्ला असते असे म्हटलं आहे.
तर पैसा हे साधन आहे साध्य नाही. त्यामुळे पैसाने सगळं साध्य करता येत नाही. तर काम करणाऱ्यांच्या मागे लोक उभं राहतात असेही गुलाबराव पाटील म्हणाले.