औरंगजेबचा पुळका या नेत्यांना का येतो? तो काय यांचा बापजादा होता?; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्याचा टोला
गायकवाड यांनी, आपल्याला या महाराष्ट्राचे दुर्दैव वाटत असल्याचे म्हटलं आहे. तसेच का विविध पक्षाचे नेत्यांना औरंगजेबचा पुळका का येतो असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.
बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वाद न मिटता फक्त वाढतानाच दिसत आहे. राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी आपली बाजू मांडत वादग्रस्त वक्तव्यांवर आपली मते सांगितली. पण आता नव्या वादानेच तोंड वरती काढले आहे. तो वाद आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा. बावनकुळे कुळे यांनी औरंगजेबचा औरंगजेबजी असा उल्लेख केला.
बावनकुळे कुळे यांनी औरंगजेबचा औरंगजेबजी असा उल्लेख केल्याने सध्या भाजपवर टीका होताना दिसत आहे. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रीया देताना बावनकुळेंसह वादग्रस्त विधान करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
यावेळी गायकवाड यांनी, आपल्याला या महाराष्ट्राचे दुर्दैव वाटत असल्याचे म्हटलं आहे. तसेच का विविध पक्षाचे नेत्यांना औरंगजेबचा पुळका का येतो असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्या औरंगजेबने घरातील लोकांची कत्तल केली त्याला इतका सन्मान का? कशासाठी? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.