‘एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन….,’ काय म्हणाले संजय शिरसाट

| Updated on: Feb 24, 2024 | 6:32 PM

दक्षिण मुंबई आणि कोकणातील शिवसेनेच्या जागांवर भाजपा आपले दोन उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा आहे. राहुल नार्वेकर यांना अरविंद सावंत यांच्याविरोधात तर कोकणात विनायक राऊत यांच्या विरोधात नारायण राणे यांना भाजपा उतरविणार आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Follow us on

छत्रपती संभाजीनगर | 24 फेब्रुवारी 2024 : कोकणातून विनायक राऊत यांच्या विरोधात नारायण राणे यांना तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या विरोधात राहुल नार्वेकर यांना भाजपा उतरविण्याची शक्यता आहे, याबद्दल शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रीया दिली आहे. या जागा शिवसेनेच्या आहेत. परंतू अजून वेळ आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या तोंडातून याबाबत वक्तव्य येत नाही तोपर्यंत ते अधिकृत नाही असेही आमदार शिरसाट यांनी म्हटले आहे. यंदाची लोकसभा इतक्या ताकदीने लढविली जाणार आहे. अनेक इच्छुक तयार होतात. 28 तारखेनंतर खरं चित्र स्पष्ट होणार आहे. संजय राऊत हा फूट पाडणार माणूस आहे. शकूनी मामा आहे. तो कुणाची तारीफ करेल हे सांगता येणार आहे. 2024 येऊ द्या. तो कुणाच्याही मांडी कधीही टुणकन उडू मारु शकेल हे कुणालाही कळणार नाही. त्याला पुन्हा जेलमध्ये जायचे नाही, हा इतरांकडे रात्रीचा जाऊन पाया पडतो हे तुम्हाला माहीती आहे का ? अशा भाषेत संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाले आहे.यावर बोलताना एकाने तुतारी वाजवायची आणि एकाने मशालीने लोकांची घरं जाळायची हीच यांची कामं राहील्याची टीका शिरसाट यांनी केली आहे.