‘वडेट्टीवार हे काय मोदी यांच्यासोबत नाश्ता करायला बसले होते का?’, शिंदे गटाच्या नेत्याचा खोचक सवाल

| Updated on: Aug 16, 2023 | 1:23 PM

अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे सध्या टीकांचा महापूर आला आहे. तर दाव्यांना देखील पेव फूटला आहे. असाच दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्यावर शिंदे गटाच्या नेत्याने पलटवार केला आहे.

औरंगाबाद : 16 ऑगस्ट 2023 | विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीवरून दावा केला होता. त्यांनी शरद पवार यांना भाजप सोबत आना तुम्हाला मुख्यमंत्री करू अशी ऑफर अजित पवार यांना दिली होती. तर शरद पवार हे भाजप सोबत आले तर त्यांना केंद्रात स्थान देऊ आणि सुप्रीया सुळे यांच्यासह जयंत पाटील यांना सामावून घेऊ अशी ऑफर दिल्याचाही दावा त्यांनी केला होता. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी घणाघाती टीका केली आहे. शिरसाट यांनी, विरोधी पक्ष नेत्याला असे बोलणे शोभत नाही. त्यानी अशी सूत्राच्या आधारे माहिती देणे चुकीचा आहे. तर सत्ताधाऱ्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते आणि त्याची हेडलाईन बनते असा त्यांचा समज असल्याचा टोला लगावला आहे. तर वडेट्टीवारांना अशा गोष्टी सांगतच कोण? ते काय मोदी साहेबांसोबत नाश्ता करायला बसले होते का? असा खोचक सवाल देखील केला आहे. त्याचबरोबर आपले अस्तित्व आहे हे दाखवण्याचा प्रयत्न वडेट्टीवार करतात असा टोला लगावला आहे.

Published on: Aug 16, 2023 01:23 PM
महाविकास आघाडीतील आणखी एक नेता महायुतीसोबत जाणार? काँग्रेसवर केली टीका
‘…म्हणूनच बाळासाहेब ठाकरे दवाखाना काढलाय; राऊत यांच्यावर कुणाचा हल्लाबोल