आंबेडकर यांच्या फुले वाहण्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, ‘या घटनेने थोडा राग, थोडा द्वेष आलाय’
आंबेडकर यांच्या त्या कृतीवरून आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आंबेडकर यांच्या वर टीका करताना, आंबेडकर सारख्या विद्वान नेत्याकडून अशी घटना अपेक्षित नव्हती. आम्ही त्यांना वेगळ्या अँगलने पाहतो.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीस्थळाला भेट दिली. कबरीवर फुलं वाहिली. त्यावरून आता राज्यातील राजकारण गरम होताना दिसत आहे. यावरून शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिखट प्रतिक्रिया आल्या आहेत. आंबेडकर यांच्या त्या कृतीवरून आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आंबेडकर यांच्या वर टीका करताना, आंबेडकर सारख्या विद्वान नेत्याकडून अशी घटना अपेक्षित नव्हती. आम्ही त्यांना वेगळ्या अँगलने पाहतो. मात्र या घटनेने थोडा राग, थोडा द्वेष आलाय असे ते म्हणाले. तर औरंगजेबाने पहिल्यांदा टार्गेट केलं ते दलित समाजाला हे कसं आंबेडकर विसरले असा सवाल त्यांनी केला आहे. तर त्याच्याबद्दल आत्ताच कशी आपुलकी आली? असा सवाल करताना, मुस्लिम समाजामध्ये औरंगजेब नाव सुद्धा ठेवले जात नाही. इतका कडवट विरोध मुस्लिम समाज करतो. मग त्याचं चांगुलपण करायची आपल्याला गरज काय आहे?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.