शिंदे गटाचे आमदार म्हणाले, ‘तर दोन पावले मागे येऊ…’ हे आहे कारण
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हा सगळ्या लोकांमध्ये आहेत. उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे विचार आधी होते मात्र काँग्रेसच्या नादी लागून त्यांनी ते विचार सोडले. उद्धव ठाकरे शिवतीर्थ बोलले तरी ते बाळासाहेबांचा कट्टर हिंदुत्वाचा विचार लोकांना देऊ शकणार नाहीत.
बारामती : 5 ऑक्टोबर 2023 | संजय राऊत ही एक पागल केस आहे. त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. जेव्हा एखाद्या शासकीय रुग्णालयामध्ये कुणी दगावतो यात काही आजार असतो. उद्धव ठाकरेंच्या काळात कोरोना आला. या काळात जेवढे लोक मेले या गोष्टीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत का? तेव्हा त्यांनी राजीनामा द्यायचा होता. शेवटी जेव्हा एखाद्या आजारात एखादा दगावला जातो तेव्हा डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा? मुख्यमंत्री स्टेथोस्कोप घेऊन रुग्णांना तपासणार आहेत का? त्यांना गोळ्या देणार आहेत का? या सगळ्या गोष्टींसाठी एक वेगळी यंत्रणा काम करत असते, अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. शिवतीर्थ आम्हाला मिळावे अशी आमची मागणी होती. मात्र, आम्ही अडून बसणार नाही. दोन्हीकडचे सैनिक हे बाळासाहेबांचेच आहेत. या संघर्षामध्ये आम्ही एकमेकांचे रक्त सांडणार नाही. गरज पडली तर आम्हीदेखील दोन पावले मागे येण्याचा विचार करू असे त्यांनी स्पष्ट केले.