ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार? शिंदे गटाच्या खासदाराचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ”त्यो म्हणतोय त्याच्या उलट….”
त्यानंतर आता पुन्हा एकदा कीर्तीकर यांनी त्यांच्या विधानामुळं खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील खासदार आणि आमदारा संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी काही दिवसांपुर्वी भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे गटाला सापत्नभावाची वागणूक मिळते आहे. शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक आहे. त्यामुळे आमच्या शिवसेनेला त्याप्रमाणेच दर्जा आणि वागणूक मिळाली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कीर्तीकर यांनी त्यांच्या विधानामुळं खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील खासदार आणि आमदारा संपर्कात असल्याचा दावा केला आहे. विनायक राऊत यांचा हा दावा कीर्तिकर यांनी खोडून काढला आहे. उलट ठाकरे गटाचे 12 आमदार आणि काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा कीर्तिकर यांनी केला आहे. कीर्तिकर यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. कीर्तिकर यांच्या या दाव्यामुळे ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचं भाकीत वर्तवलं जात आहे.