राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढल्या, मोक्का ही लावा अशी होतेय मागणी
खासदार शेवाळे यांचे दाऊदशी संबंध असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयाकडे एक तक्रार दाखल केली होती
कथित प्रेमसंबंधं प्रकरणी चर्चेत आलेले शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. शेवाळे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले होते. तर त्या महिलेचे दाऊदशी संबंध होते असा खुलासा शेवाळे यांनी केला होता. त्यानंतर आता कोर्टानेच शेवाळे यांना प्रतिसवाल करत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
शेवाळे यांनी संबंधीत महिलेचे दाऊदशी संबंध होते असं म्हटलं होतं. त्यावरून आता याप्रकरणी न्यायाधिश यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणी तातडीने सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेशच राज्य सरकारला दिले आहेत.
तर खासदार शेवाळे यांचे दाऊदशी संबंध असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयाकडे एक तक्रार दाखल केली होती. तसेच या आज राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानुसार याप्रकरणी तातडीची सुनावणी होईल असेही संकेत मिळत आहेत.