खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाचीच : जेठमलानी

| Updated on: Jan 10, 2023 | 7:54 PM

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनावणी वेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेवर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटावर हल्ला बोल केला. त्याचबरोबर त्यांनी शिंदे गटासाठी एक मोठं वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यात सध्या राजकारण तापलेलं दिसत आहे.

नवी दिल्ली : राज्याच्या सत्तासंघर्षात सगळ्यात महत्वाचा विषय धनुष्यबाण हे चिन्ह बनला आहे. त्यावर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपला हक्क सांगितला आहे. त्यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनावणी वेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेवर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटावर हल्ला बोल केला. त्याचबरोबर त्यांनी शिंदे गटासाठी एक मोठं वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यात सध्या राजकारण तापलेलं दिसत आहे.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनावणीनंतर शिंदे गटाकडे आमदार आणि खासदारांचं बहुमत आहे. तर कायद्याच्या निकषानुसार शिंदे गटच हा खरी शिवसेना असल्याचेही वकील जेठमलानी यांनी म्हटलं आहे.

Published on: Jan 10, 2023 07:54 PM
‘लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार सुरू’ : अनिल देसाई
त्यांना चाकणकरांच पद हवं असेल; सुषमा अंधारे यांची चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका