‘भाजपचा आमदार करायचाच असेल तर स्वतंत्र लढावं’; शिंदे गटाच्या नेत्याचा विखे पाटील यांना टोला
याच्याआधी विखे पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे शिंदे गटावर अन्याय करतात असा आरोप कोकाटेंनी केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोकाटेंनी पालकमंत्री विखे पाटील यांनी माढा विधानसभा मतदार संघावर भाजपचा दावा केल्याने टीका केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शिवसेना व भाजपमध्ये धुसफूस सुरुच असल्याचे समोर येत आहे. येथे अजूनही माढा मतदार संघावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्यात वाद होताना दिसत आहे. याच्याआधी विखे पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे शिंदे गटावर अन्याय करतात असा आरोप कोकाटेंनी केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोकाटेंनी पालकमंत्री विखे पाटील यांनी माढा विधानसभा मतदार संघावर भाजपचा दावा केल्याने टीका केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावेळी विखे पाटील यांनी माढ्याचा आमदार आता भाजपचा करायचाय असं टेभुर्णीत वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांचा हा दावा कोकाटेंनी दावा फेटाळत टीका केली आहे. त्यांनी, माढ्याची ही जागा शिवसेनेचीच आहे. विखेना भाजपचा आमदार करायचाच असेल तर स्वतंत्र लढावं लागेल. नाही तर राष्ट्रवादीच्या आमदार बबनराव शिंदेंनाच पक्षात प्रवेश देऊन तिकीट द्यावं लागेल असा टोला लगावला आहे. तसेच दोन्ही पैकी काय करायचं ते विखेनी ठरवावं असही कोकाटेंनी म्हटलं आहे.