‘राऊत होते प्रवक्ते, आता हे कशाला होतायत?’; रोहित पवार यांच्या त्या दाव्यावर शिंदे गटाच्या नेत्याचा टोला
आता देखील त्यांनी थेट शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. रोहित पवार यांनी धाराशीव येथील पत्रकार परिषदेत शिंदे गटाबाबत हा दावा केलाय. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे पंधारा आमदार हे नाराज असून ते ठाकरे गटात जातील असा दावा केलाय.
औरंगाबाद, 14 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सध्या शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाना साधण्याचा कोणताच मुद्दा सोडत नाहीत. आता देखील त्यांनी थेट शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. रोहित पवार यांनी धाराशीव येथील पत्रकार परिषदेत शिंदे गटाबाबत हा दावा केलाय. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे पंधारा आमदार हे नाराज असून ते ठाकरे गटात जातील असा दावा केलाय. तर त्यांना ठाकरे घेतील का असा सवाल असल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाने पलटवार केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या या दाव्यावर चोख प्रत्युत्तरही दिलं आहे. यावेळी शिरसाट यांनी, रोहित पवारही उद्धव गटाचे प्रवक्ते झाले का? ते प्रवक्ते म्हणजे आश्चर्य आहे. राऊत होते प्रवक्ते, आता हे कशाला होतायत? असा सवाल करताना रोहितजी आपला पक्ष बरा, आपल्याला काय करायचं दुसऱ्या पक्षात काय चाललंय ते”, अशी टीका त्यांनी केलीय.