शिवसेना खासदाराचे खळबळजनक वक्तव्य; ‘लवकरच महायुतीमध्ये काँग्रेसचे नेते सहभागी होणार’

| Updated on: Aug 21, 2023 | 1:17 PM

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील नेते हे महायुतीत सहभागी होत आहेत. त्यामुळे शरद पवार गट आणि ठाकरे गटाला खिंडार पडत आहे. त्याचदरम्यान आता शिंदे गटाच्या नेत्यानं आणखीन एक मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.

बुलढाणा : 21 ऑगस्ट 2023 | आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. तर इच्छुकांकडून देखील आता चाचपणी केली जात आहे. त्यामुळे अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात जाताना येताना दिसत आहेत. याचदरम्यान काँग्रेस पक्षात काहीच दिवसांपुर्वी एक नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून मतभेद समोर येत आहेत. यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठा दावा केला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. जाधव यांनी काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट अस्वस्थ आहे.तर हा गट लवकरच एक मोठा निर्णय घेणार असून तो महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय भूकंपाची मालिका संपली नसून आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Aug 21, 2023 01:17 PM
‘शरद पवार या एका नावामुळेच तुम्हाला…’; राऊत यांनी थेट वळसे-पाटील यांना आरसाच दाखवला
‘पवार साहेबांना कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’; वळसे पाटील यांचा यु टर्न