आमच्याबरोबर आले तर त्या घोषणांच काहीतरी होऊ शकतं; शिरसाट यांचा टोला

| Updated on: Mar 09, 2023 | 12:50 PM

राजकारणामध्ये अशा घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होत नाही असं शिरसाट यांनी म्हटलं आहे

मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली आहे. तर मुळची शिवसेना हा फक्त ठाकरे गटापुर्ती मर्यादीत झाल्याने सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटात एकमेकांवर टीका होत असते. ठाकरे गटाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित वरळी येथील कार्यक्रमात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील अशा घोषणा देण्यात आल्या तर उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच राजकारणामध्ये अशा घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होत नाही असे म्हटलं आहे. तर ते शिवसेनेचे मुख्यमंत्री होणार अशा घोषणा दिल्याचे सांगताच, कदाचित त्यांना आमच्या बरोबर राहायचं असेल आणि आमच्या बरोबर जर आले तरी शक्यता आहे मगच त्यांचं काहीतरी होऊ शकतं अशी टीपणी केली आहे.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात दाखल, थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार
भाजपचं हिंदु प्रेम बेगडी, सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करतं; ‘त्या’ निर्णयावरून टीकेची झोड