Video : शिर्डीत आज भक्तीमय वातावरण; साई परिक्रमेला सुरूवात
शिर्डीत आज साई परिक्रमा महोत्सव होतो आहे. भक्तीमय वातावरणात साई परिक्रमेला सुरूवात झाली आहे. त्याचा व्हीडिओ, पाहा...
शिर्डी, अहमदनगर : शिर्डीत आज साई परिक्रमा महोत्सव होतो आहे. भक्तीमय वातावरणात साई परिक्रमेला सुरूवात झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरदेखील या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. शिर्डीतील खंडोबा मंदिरापासून साई परिक्रमेला सुरूवात झाली आहे. परिक्रमेनिमित्त साईनामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमली आहे. हजारो साईभक्त आज शिर्डीत उपस्थित आहेत. साईबाबांच्या जीवनावर आधारित शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. बँडपथक , ढोलपथकाच्या निनादात परिक्रमा सुरु झाली आहे. 13 किलोमीटर ही परिक्रमा चालणार आहे.