अमोल कोल्हे भाजपत प्रवेश करणार? अमोल कोल्हे यांनी स्पष्टच सांगितलं…
मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय ते भाजपत प्रवेश करतील, असंही बोललं जातंय. यावर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पाहा व्हीडिओ...
मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय ते भाजपत प्रवेश करतील, असंही बोललं जातंय. यावर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “लोकशाहीमध्ये राजकारणाचा पोत बदलत चालला आहे. संसदेतील माझ्या भाषणनंतर पण अजूनही हा प्रश्न लोकांना पडत आहेत. जर तसं असेल तर लोकांनी माझे संसदेतील पूर्ण भाषण ऐकावं. माझ्या संसदेच्या भाषणात “कभी खुशी कभी गम” आहे का? हे तुम्हाला कळेल, असं अमोल कोल्हे म्हणालेत. शिवाय जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरही ते बोललेत. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून या विषयी मला माहीत नाही. मी त्यादिवशी संसदेत होतो. त्यामुळे मी याविषयी काही बोलू शकत नाही, असंही अमोल कोल्हे म्हणालेत.
Published on: Feb 11, 2023 07:51 AM