Satish Bhosale : ‘आमची बदनामी थांबवा’; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
Shirur Kasar Crime : शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी खोक्या भोसलेच्या पत्नीने विविध मागण्यांसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.
शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी खोक्या भोसलेच्या पत्नीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. तसंच यांच्या विरोधातला अपप्रचार थांबवा अशी देखील मागणी यावेळी खोक्या भोसलेच्या पत्नीने केली आहे.
शिरूर कासार मधील ढाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणातील आरोपी असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याने हरणांची शिकार केल्याचा देखील पोलिसांना संशय आहे. त्याचे काही पैसे फेकतानाचे व्हिडिओ व्हारायल झाल्यानंतर तो गायब झाला होता. पोलिसांनी त्याला प्रयागराज येथून अटक केलेली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. मात्र वन विभागाने कोणतीही नोटिस न देता खोक्याच घर हे अतिक्रमण असल्याचा दावा करत पाडलं आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी खोक्याच्या बायकोने केली आहे. त्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेजू सतीश भोसले या उपोषणाला बसलेल्या आहेत.