वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येलाच ठाकरे गटाला मोठा धक्का! आनखी एका नेत्यानं केला जय महाराष्ट्र
शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र सुपूर्त केलं. आपल्याला ठाकरे गटात मनासारखं काम करायला मिळत नसल्यानेच आपण हे पाऊल उलल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी आपली नाराजी देखील पत्रातून ठाकरे यांनी कळवली.
मुंबई : राज ठाकरे यांच्याबरोबर जाणारे आणि परत 2018 ला शिवसेना ठाकरे गटात परतणारे शिशिर शिंदेंनी पुन्हा एकदा शिवसेनाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गट उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र सुपूर्त केलं. आपल्याला ठाकरे गटात मनासारखं काम करायला मिळत नसल्यानेच आपण हे पाऊल उलल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी आपली नाराजी देखील पत्रातून ठाकरे यांनी कळवली. तसेच पक्षात होणारी घुसमटीमुळेच आपणच थांबवत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. तर माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे फुकट गेली अशी माझी धारणा आहे. 30 जून 2022 रोजी माझी शिवसेना उपनेते म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले, असे शिंदेंनी पत्रात म्हटलं आहे.
Published on: Jun 18, 2023 09:10 AM