शिवरायांच्या नखाची ही सर येणार नाही, राजू पाटील यांची देखाव्यावर टीका
तुलना करताना जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा अशा शब्दांमध्ये जोरदार टीका मनसे आमदार पाटील यांनी केली आहे
मुंबई : शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून डोंबिवली शहर शाखेबाहेर ‘३५० वर्षानंतर .. पुन्हा तोच योग’ या आशया देखावा करण्यात आला. त्यावर आता मनसे आमदार पाटील यांनी ट्विट करत खोचक टीका केली आहे. पाटील यांनी ट्विट करत, उपमांनी किंवा तुलनांनी शिवरायांच्या नखाची ही सर येणार नाही असं म्हटलं आहे. तुलना करताना जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा अशा शब्दांमध्ये जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी कोणी स्वतःला जाणता राजा म्हणून तर कोणीही अशी चित्र काढून घेतात असे म्हणत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
Published on: Mar 11, 2023 02:43 PM