यवतमाळमध्ये शिवसैनिक आक्रमक; खासदार भावना गवळीचा पुतळा जाळून निषेध

| Updated on: Jul 20, 2022 | 5:22 PM

यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांना तुम्ही आमच्याशी माणुसकीने बोला आम्ही लहान लोक नाही आहोत असे खडे बोल सुनावले. तुमच्या अंगावर वर्दी आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही करा असेही म्हटले. पोलिसांनी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याने बाचाबाची घटना घडली.

यवतमाळ – शिवसेनेच्या बंडखोर गटात दाखल झालेल्या खासदार भावना गवळी(Bhavana Gavali) यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. संतापलेल्या आंदोलकांनी खासदार भावना गवळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध केला. यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांशीही(Police) आंदोलकांनी बाचाबाची केली. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांना तुम्ही आमच्याशी माणुसकीने बोला आम्ही लहान लोक नाही आहोत असे खडे बोल सुनावले. तुमच्या अंगावर वर्दी आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही करा असेही म्हटले. पोलिसांनी आंदोलन (Andolan)मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याने बाचाबाची घटना घडली.

 

Published on: Jul 20, 2022 05:21 PM
Munde On OBC Verdict | ओबीसी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत, महाविकास आघाडी सरकारच्या कार्याची ही पोचपावती, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसींना न्याय मिळाला नाही – बावनकुळे