Mohit Kamboj car attack : भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला
भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसैनिकांनी मातोश्री परिसरात कंबोज यांच्या वाहनावर हल्ला केला. कंबोज हे रेकी करण्यासाठी कलानगर भागात आल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. त्यानंतर कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला.
भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसैनिकांनी मातोश्री परिसरात कंबोज यांच्या वाहनावर हल्ला केला. कंबोज हे रेकी करण्यासाठी कलानगर भागात आल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. त्यानंतर कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. दरम्यान आता यावर मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली, कंबोज यांनी यावेळी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कंबोज यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर कलानगर परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
.