‘अॅक्शनला रिअॅक्शन देण्यापेक्षा की काम करणार ‘- धैर्यशील माने
चंदूर येथे कार्यक्रमानिमित्त खासदार माने जात असताना त्यांचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ताफा अडवला
हातकणंगले : काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कोल्हापूर दौरा केला. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद सांधला. तर जिल्ह्यातील दोन्ही खासदार जे शिंदे गटात गेले त्यांच्यावरही जोरदार टीका केली. तर खासदार धैर्यशील माने यांच्यावर बोचरा वार करत मानेंनी ‘मीच खासदार’ टॅगलाईन बदलून आता ‘मीच गद्दार’ करावी असं म्हटलं होत. त्यानंतर आता चंदूर येथे कार्यक्रमानिमित्त खासदार माने जात असताना त्यांचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ताफा अडवला. साहेब गद्दारी का केली? असा सवालही करत काळे झंडे दाखवले. यावरून हातकणंगलेमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार माने यांनी, कितीही विरोध झाला तरी कामं करणार असं म्हटलं आहे.