shiv sangram Vinayak mete passed away: विनायक मेटेंच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा, अनेकांना अश्रू अनावर

shiv sangram Vinayak mete passed away: विनायक मेटेंच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा, अनेकांना अश्रू अनावर

| Updated on: Aug 14, 2022 | 9:48 AM

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर खोपोली इथल्या बातम बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे यांच्यासह असलेले त्यांच्या सहकारीही जबर जखमी झाले होते. तर कारचा चक्काचूर झाला होता.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज विनायक मेटे यांचा भीषण अपघात (Vinayak Mete Accident) झाला. या अपघातात त्यांचे निधन झाले. विनायक मेटे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी समाजासाठी केलेल्या कामांमुळे त्याच्यावर प्रेम करणारे असंख्य लोकं आहेत. विनायक मेटे यांच्या निधनामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. बीडमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर खोपोली इथल्या बातम बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे यांच्यासह असलेले त्यांच्या सहकारीही जबर जखमी झाले होते. तर कारचा चक्काचूर झाला होता. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर लगेचच विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Published on: Aug 14, 2022 09:48 AM
shiv sangram Vinayak mete passed away: डॉक्टरांची प्रतिक्रिया! “डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू”
VIDEO | Nitin Gadkari On Vinayak Mete | महाराष्ट्राच्या विकासकामांमध्ये विनायक मेटे यांचा मोठा सहभाग